महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!
तुम्हाला ते कदाचित ठाऊक नसणार. मी पुणेकर आहे! मी या शहरात जन्मलो आहे. माझा जन्म इथला असावा हे तुमच्यापैकी काहींना कदाचित आवडणार नाही. पण माझ्या आयुष्यातला अतिशय आनंददायी आणि संस्मरणीय भाग या शहरात गेला. नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यं माझ्यात इथं रुजली. ज्या अरब बाईला गोदाबाईनं बहीण म्हणून दत्तक घेतलं होतं, त्या बाईचा मी मुलगा आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रीय म्हणवून घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे.......